Monday, January 29, 2018

ALP Presentation

ALP विषयी संपूर्ण माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.....

Power point Presentation for ALP  संपूर्ण माहिती

How to take ALP lectures in the class PPT. of  English.

Thursday, November 10, 2016

RMSA अंतर्गत शाळा अनुदान

               RMSA अंतर्गत शाळा अनुदान 
शाळा अनुदान – विनियोग मार्गदर्शिका
                                                   Image result for rmsa logo
शाळा अनुदान – विनियोग मार्गदर्शिका

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत आवर्ती अनुदानामधून प्रति वर्षी जिल्हा परिषद , मनपा, नपा,शासकीय ,अदिवासी विकासातील आश्रम शाळा व समाज कल्याण विभागातील शासकीय आश्रम शाळांना रु.50,000/- प्रति शाळा 'शाळा अनुदान' म्हणून देण्यात येतात. सदरची रक्कम 'शाळा व्यवस्थापन व विकास समितीच्या' मान्यतेने विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन खर्च करण्याबाबत वेळोवेळी परिपत्रकाद्वारे व मार्गदर्शक सभा मधून 'रामाशिअ' तर्फे कळविण्यात आलेले आहेत.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाकडील गुणवत्ता , समानतेसाठीचे विस्तारित जाणारे उपक्रम लक्षात घेता शाळा शाळा अनुदानामधून खर्च करावयाच्या मान्य बाबींची यादी खालील प्रमाणे :

शाळा अनुदानातून खर्च करावयाच्या मान्यबाबींची यादी:-
  1. वर्तमान पत्रे , शैक्षणिक मासिके , व्दिमासिके , त्रैमासिके , वार्षिके इत्यादी नियतकालिके.
  2. शालेय गुणवत्ता वाढीकरीता विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग उअपक्रम आयोजन .
  3. विविध शैक्षणिक साहित्य.
  4. शालेय पुस्तके , हस्तपुस्तिका , संदर्भ ग्रंथ.
  5. विविध शब्दकोश.
  6. विविध पुस्तके.
  7. पुस्तक , अहवाल बांधणी.
  8. शालेय व कार्यालयीन स्टेशनरी.
  9. वीज बील.
  10. इलेक्ट्रीकल उपकरणे.
  11. फोन व इंटरनेट बील.
  12. पाणीपट्टी बील.
  13. फर्निचर .
  14. कॅमेरा.
  15. आयसीटी संदर्भातील संदर्भ पुस्तके व सॉप्ट मटेरियल.
  16. संगणकाचे सुटे भाग व संगणक दुरुस्ती.
  17. संगणक CD , Floppy , Software, Pen drive, इत्यादी.
  18. Water Purifier , Smart Board, Edu. Projector.
  19. LCD , Screen.
  20. शाळा व विध्यार्थ्यांच्या स्वच्छ्तेसाठी लागणारी विविध उत्पादने.
  21. खेळाचे विविध साहित्य.
  22. विविध संगीत साहित्य.
  23. कार्यानुभव विषयासाठी लागणारे अनुषंगिक साहित्य.
  24. नृत्य , चित्रकला, व सांस्कृतीक विषयांसाठीचे साहित्य.
  25. प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य.
  26. व्यवसाय मार्गदर्शन संदर्भातील साहित्य.
  27. विविध स्पर्धा परिक्षांसाठीचे साहित्य.
  28. अभ्यासिकेसाठी लागणारे साहित्य.
  29. नकाशे, तक्ते , मॉडल्स, इत्यादी.
  30. शालेय बगीच्यासाठी लागणारे साहित्य.
  31. नकाशा स्टॅड .
  32. पृथ्वीगोल.
  33. E-Learning साठी लागणारे साहित्य.
  34. व्यवसाय शिक्षण – शाळा VE अंतर्गत असल्यास लागणारे अनुषंगिक साहित्य.
  35. गुणवत्ता वाढीसाठीच्या विविध उपक्रमांसाठी लागणारे नोंदणी साहित्य.
  36. पत्रव्यवहार पोस्टेज
  37. प्रथमोपचार पेटी
  38. अग्निशामक संयंत्र.
  39. काचपेटी.
  40. बायोमेट्री
  41. दिनदर्शिका
  42. विविध माहिती दर्शक तक्ते- पेन्टींग , छ्पाई, फ्लेक्स इ.
  43. रामाशिअ, लोगो - पेन्टींग
  44. वचन काटा.
  45. टेबलक्लॉथ , कर्टन
  46. सायकल स्टॅड
  47. झेरॉक्स व छ्पाई.
  48. किशोरी उत्कर्ष मंच इत्यादी योजनांसाठी स्वतंत्र अनुदान न आल्यास सदर योजना
    पुढे चालू ठेवण्यासाठी.
  49. फ्लॅनल बोर्ड
  50. पाणीसाठी करीता पिंप व इतर
               वरील यादीतील साहित्य शाळांनी रु. 50,000/- शाळा अनुदानातून वित्तीय नियमावलीचा वापर करून खर्च करावे. शाळा अनुदानातून खरेदी केलेल्या साहित्याची नोंद साठा ' नोंदवहीत ' ठेवावी.शाळांनी आपल्या गरजांची निश्चिती करून प्राधान्य क्रम ठरवावे. शाळा व्यवस्थापन व विकास समितीच्या मान्यतेने अनुदान खर्च करावे. अनुदान संबंधित आर्थिक वर्षाच्या मार्च महिन्या अखेर पर्यंत खर्च करावे                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              संकलन :- श्री. सचिन कांबळे ( KRP )                                                                                                  संदर्भ :- रामाशिअ/ वित्तविभाग                                                                                                                                                                            

Friday, October 21, 2016

मुलींकरिता स्व:संरक्षण प्रशिक्षणाबाबत

मुलींकरिता स्व:संरक्षण प्रशिक्षणाबाबत
                                  Image result for rmsa logo

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत माध्यमिक शाळांतील  मुलींकरिता स्व: संरक्षण प्रशिक्षण अनुदान प्राप्त झाले असून त्या बाबतीत अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा  



प्रशिक्षण व्यवस्था , अल्पोपहार, व प्रचार प्रसिद्दी,  Banner, फोटो, मुलींची बक्षिसे, प्रमाणपत्र व प्रशिक्षकांचे मानधन इ. साठी खर्च करण्यात यावा.  

स्व: संरक्षण प्रशिक्षण अंमलबजावनी अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


मुलींकरिता स्व:संरक्षण प्रशिक्षणाबाबत

मुलींकरिता स्व:संरक्षण प्रशिक्षणाबाबत

Image result for rmsa logo

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत माध्यमिक शाळांतील  मुलींकरिता स्व: संरक्षण प्रशिक्षण अनुदान प्राप्त झाले असून त्या बाबतीत अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा  



प्रशिक्षण व्यवस्था , अल्पोपहार, व प्रचार प्रसिद्दी,  Banner, फोटो, मुलींची बक्षिसे, प्रमाणपत्र व प्रशिक्षकांचे मानधन इ. साठी खर्च करण्यात यावा.  

स्व: संरक्षण प्रशिक्षण अंमलबजावनी अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Saturday, October 8, 2016

Cloud Print

🖨 मोबाईल वरून प्रिंट 🖨

मित्रहो,
    आपल्या पैकी अनेक जणांना असे वाटत असेल की आपण जर आपल्या documents ची प्रिंट pc वरून न काढता direct मोबाईल वरून काढले तर किती सोपे होईल.
तर मग चला शिकू या हे कसे करायचे??


⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨
🎴 या कृती साठी आपल्याकडे wifi सुविधा असणे आवश्यक आहे
🎴 आपला मोबाईल आणि pc एकाच wifi ने connected असले पाहिजे
⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨

➡ सर्व प्रथम आपल्या computer वर Google chrome  सुरु करा
➡ ज्या मोबाईल ने प्रिंट काढायचे आहे त्या मोबाईल मध्ये वापरलेला  Gmail account नी येथे लॉगिन करा.
➡ उजव्या बाजूला वरच्या ठिकाणी तीन आडवे रेषा आहेत तिथे क्लीक करा
➡ setting मध्ये जा
➡ त्यात Advance setting हा पर्याय निवडा
➡ scroll करून cloud print हा पर्याय क्लीक करा
➡ Add printer वर क्लिक करा
➡ आपल्या computer सोबत जोडलेले सर्व प्रिंटर ची यादी दिसेल
➡ पुन्हा ऍड प्रिंटर वर क्लिक करा
➡ ज्या मोबाईल ने प्रिंट काढायचे आहेत त्यात cloud print नावाची app install करून run करा   सदर app ची लिंक messege च्या शेवटी दिलेली आहे
➡ cloud print हे app सुरु केल्यावर आपल्या ला account विचारतो. तिथे आपला Gmail चा account आलेला असेल त्यावर क्लिक करा
🎯 वरील setting आपल्याला फक्त एकाच वेळी करावी लागेल

🖥 आता आपला मोबाईल प्रिंट साठी तयार आहे

या trik ने आपण आपले मोबाईल मधले कोणतेही documents ची प्रिंट काढू शकतो

या शिवाय आपण आपल्या messege,contacts, search केलेले web page,whatsapp messeges ची प्रिंट हि काढता येते

Friday, October 7, 2016

शाळा व्यवस्थापन व विकास समिती सभा वृतांत

शाळा व्यवस्थापन व विकास समिती सभा वृतांत कसा लिहावा.

PDF मध्ये माहिती प्राप्त करण्यासाठी खाली क्लिक करा.


  • SMDC अर्थात शाळा व्यवस्थापन व विकास समिती ची सभा वृतांत कशा प्रकारे लिहिला जावा यासाठी नुमाना आपल्यास देण्याचा प्रयत्न करत आहे.
बैठक घेण्यापुर्वी :-

  • प्रथम आपण ज्या बैठकांचे आयोजन करणार आहोत त्याचा आगोदर अजेंडा - रुपरेषा - उद्दिष्ट आपल्या समोर असणे आवश्यक आसते.
  • बैठकीचे पुर्व नियोजन असणे आवश्यक असते.
  • बैठक घेण्यापुर्वी किमान पाच दिवस आगोदर सदस्यांना सभे विषयी कळविण्यात यावे.
  • मागील सभेतील काही महत्वपुर्ण बाबीच्या पुर्ततेचा सचिवांना इतिवृतांत सांगणे महत्वाचे, त्याची तयारी.


(वरील मह्त्वाच्या बाबी आपण पुर्ण करुणच सभा घेण्यात यावी.)



सभा वृतांत नमुना खालिल प्रमाणे

RMSA आंतर्गत
शाळा व्यवस्थापन व विकास समिती सभा

दिनांक :- / / 2016.


आज दिनांक ….../....../ 2016 रोजी …....................................... या शाळेत सकाळी / दुपारी …............. ….या वेळी 'शाळा व्यवस्थापन व विकास समितीची' सभा शाळेचे मुख्याध्यापक व समितीचे अध्यक्ष श्री./श्रीम. …........ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली. श्री./ श्रीम. …....................... मुख्याध्यापक /सचिव यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले व सभेस सुरवात केली.

प्रथमत: सभेपुढे आजच्या बैठकीचा अजेंडा / रुपरेषा /उद्दिष्ट श्री,/श्रीम. …..... (SMDC सचिव) यांनी वाचुन दाखवला व विषय पत्रिका प्रत वाटप केली.

सभेपुढिल विषय :- ( सभेत जे विषय आपण घेणार आहोत ते विषय एका खाली एक लिहावेत )

(नमुना दाखल विषय )
  1. मागील सभेचा इतिवृतांत सांगणे.
  2. प्राप्त शाळा अनुदान माहिती सांगणे.
  3. शैक्षणिक साहित्य खरेदी
  4. वाचनालय निर्मिती करणे
  5. श्री./ श्रीम. …...... यांच्या बदल्यात नवीन सदस्य नियुक्ती करणे.
  6. शाळा सुधार आराखडा तयार करण्यासाठी समिती कडुन सुचना व नविन योजना माहिती
    (. प्रकारे आपणाला ज्या बाबींचा उल्लेख हवा आहे तो विषय यादी मध्ये नमुद करावा)


सभा तपशील :
(सभा सुरु झाल्यास सभा तपशील नोंदवणे खुप मह्त्वाचे आसते. त्यात सर्व सदस्यांची मते नोंदवली जावीत असे अभिप्रेत असते.) जसे-

  • सुरवातीला श्री./श्रीम. ….... सचिव यांनी मागील सभेतील वृतांत वाचला . झालेल्या चांगल्या कामाबद्दल सदस्यांनी शाळेचे अभिनंदन केले.
  • श्री./श्रीम. ….... मुख्याध्यापक /समिती अध्यक्ष यांनी शै.वर्ष 2016-17 करीता प्राप्त अनुदानाचा तपशील समिती समोर सांगितला. यात शाळा अनुदान 50,000 /- रु. शाळेच्या बॅक खात्यात जमा झाल्याचे सांगितले. त्या अनुशंगाने सदर बैठकीचे आयोजन केले आहे असे अध्यक्षांनी सांगितले.
    व त्या अनुदान विनियोगाबाबत सदस्यांना विचारण्यात आले.
  • अनुदान विनियोग करणे आवश्यक असल्याने श्री./श्रीम............. सहा.शिक्षक /शिक्षिका यांनी भूगोल विषय शिकवीत असताना अपु-या शै.साहित्याची माहिती सांगितली. त्यात त्यांनी ….................. नकाशे , . आवश्यक असल्याने ते त्वरीत खरेदी करावे असे सुचविले.
सदर …...... प्रकारचे नकाशे इ. खुप मह्त्वाचे आहे ते त्वरीत खरेदी करावे असे. समिती सदस्य श्री./श्रीम. …...... (नगरसेवक) यांनी सांगितले. त्यास सर्व सदस्यांनी सर्वानुमते होकार दर्शिवला.

  • क्रिडा शिक्षक व समिती सदस्य श्री. …........ यांनी खेळा करीता आवश्यक साहित्य खरेदी करण्यात यावे असे सुचविले त्यात त्यांनी ….................................... . साहित्य घेण्यात यावेत अशी विनंती केली.
या खेळाचे साहित्य मी. स्वत: माझ्या निधीतून शाळेस देण्यात येतील असे महिला बचत गटाच्या प्रमुख व समिती सदस्य श्रीम. …...... यांनी सांगितले . तेव्हा शाळा अनुदनाचा वापर इतर दुस-या मह्त्वाच्या कामासाठी वापरण्यात यावा असे सांगितले. यांच्या सुकर्तव्याचा स्विकार करण्यात येईल असे सचिवांनी सांगितले व सर्वानुमते त्यांचे आभार व्यक्त केले.

  • मुख्याध्यापक श्री./ श्रीम. …... यांनी कार्यालयीन उपयोगासाठी फर्निचर घेणे आवश्यक आहे असे सांगितले.
    तेव्हा सदर साहित्य वेगवेगळ्या निवेदा मगवुन त्वरित खरेदी करावे असे समितीने सर्वानुमते संमती दिली.

    ( अशा प्रकारे एक-एक विषयाला सुरवात करुन त्यावर आलेले मते नोंदविण्यात यावीत. वरील नमुन्याच्या आधारे ते लिहिण्यास नक्कीच सुलभ होईल.)

(शेवट करताना अशा प्रकारे करावा.......)

समारोप :-
आजच्या सभेस उपस्थित सद्स्यांचे श्री. / श्रीम....... यांनी आभार मानले व वरील कार्यपुर्ती अहवालाकरिता तसेच आवश्यकतेनुसार पुढील सभेचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. सभेसाठी उपस्थित सर्व सदस्यांना आल्पोपहार व चहा देण्यात आला.

सभेस उपस्थित सदस्यांची स्वाक्षरी :


.क्र.
नाव
भूमिका
स्वाक्षरी
1

अध्यक्ष

2

सदस्य - सचिव

3

सदस्य

4

सदस्य

5

सदस्य

6

सदस्य

7

सदस्य

8

सदस्य

9

सदस्य

10

सदस्य

11

सदस्य

12

सदस्य

13

सदस्य

14

सदस्य

15

सदस्य

16

सदस्य

17

सदस्य


मुख्याध्यापक / अध्यक्ष स्वाक्षरी
(शाळेचा शिक्का)
CREATED By :-SACHIN KAMBLE MUMBAI